Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निदा खानला टीसीएस कंपनीने केले निलंबित;नाशिक धर्मांतर प्रकरणी कारवाई

मुंबई : नाशिक शहरातील चर्चेत असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित म्हणून समोर आलेल्या निदा खान यांच्यावर त्यांच्या कंपनीने अखेर निलंबनाची कारवा

सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
बीडमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा धडक कारभार; साडेआठ लाखांचा साठा जप्त!
किनवटमध्ये दिव्यांग कर्मचार्‍याला नगरसेवकाची मारहाण; काम बंद आंदोलनाचा इशारा!
TCS Nashik Nida Khan Case: निलंबन पत्रात काय आहे? 'या' कारणामुळे निदा खान  निलंबित

मुंबई : नाशिक शहरातील चर्चेत असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित म्हणून समोर आलेल्या निदा खान यांच्यावर त्यांच्या कंपनीने अखेर निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असून, पुढील शिस्तभंगाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कंपनीकडून 9 एप्रिल रोजीच अधिकृत पत्राद्वारे निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला होता; मात्र ही बाब आता उघडकीस आली आहे. संबंधित पत्रात, निदा खान यांच्याशी निगडित गंभीर स्वरूपाचे प्रकरण समोर आल्याचा उल्लेख आहे. सध्या त्या न्यायालयीन किंवा पोलीस कोठडीत असल्याने त्या आपल्या जबाबदार्‍या पार पाडू शकत नाहीत, या कारणावरून त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. निलंबन आदेशात पुढे असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, निदा खान या डिसेंबर 2021 पासून कंपनीत कार्यरत होत्या. त्यांचे पद ‘प्रक्रिया सहयोगी’ असे होते. निलंबनासोबतच त्यांचा संगणकीय प्रवेश तात्काळ बंद करण्यात आला असून, त्यांच्या ताब्यातील कंपनीची सर्व साधने आणि साहित्य परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांना कार्यालयात हजर राहण्यास किंवा घरून काम करण्यासही मनाई करण्यात आली आहे. कंपनीने गोपनीयतेवर विशेष भर देत, या प्रकरणाबाबत कोणत्याही सहकार्‍याशी चर्चा करू नये, असा स्पष्ट इशारा दिला आहे. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश मनुष्यबळ विभागाच्या प्रमुखांकडून जारी करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर, राज्य महिला आयोगाने स्थापन केलेल्या तथ्यशोधन समितीकडूनही तपास सुरू आहे. समितीचा तपास तिसर्‍या दिवशीही सुरू असून, पुरावे संकलन आणि साक्षी नोंदविण्याचे काम वेगाने सुरू आहे. आरोपांची सत्यता पडताळणे आणि या प्रकरणात कोणतीही हलगर्जी किंवा इतर कारणे आहेत का, याचा सखोल शोध घेण्याचे काम समितीकडून केले जात आहे.

COMMENTS