Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम सहकारी बँकेस चार कोटींचा नफा  

कोपरगाव :  गौतम सहकारी बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमद

सोलर योजनेत शेतकऱ्याची फसवणूक
भगवान महावीरांचा ‘जगा आणि जगू द्या’ संदेश आचरणात आणावा : नगराध्यक्ष गाडेकर
पोल्ट्रीला कृषी दर्जा न मिळाल्यास आंदोलन : बाळासाहेब देशमुख

कोपरगाव :  गौतम सहकारी बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष  काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेला ४१४.०६ लाख रुपये ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी करून निव्वळ नफा १३५.४८ लाख झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन संजय आगवन, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.

गौतम बँकेने गेल्या काही वर्षांत विकासाच्या दिशेने यशस्वी घौडदौड  सुरु आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक ताळेबंदानुसार बँकेचा निव्वळ १५ टक्केने वाढून १ कोटी ३५लाख ४८ हजारांपर्यंत पोहोचला आहे. तर स्थूल नफ्यात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ७४ टक्के ची मोठी वाढ झाली आहे. ही आकडेवारी बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीची साक्ष देत आहे. बँकेने केवळ नफ्यातच नाही तर एकूण व्यवसायातही मोठी झेप घेतली आहे.

 बँकेच्या चोख व्यवहार पद्धतीमुळे ठेवीदारांनी बँकेवर अतूट विश्वास दाखवला असून बँकेकडे एकूण १४८ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी असून चालू वर्षी बँकेने ८९ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बॅकेची गूतवणुंक ७७०४.२७ लाख असून सी.आर.अ.आर १९.३८% आहे. पी.सी.आर २१६.७३% आहे. नेटवर्थ १३९८.६१ लाख आहे या  बँकेचे एकूण व्यवहार २३८०६.४८ लाखांचे च्या जवळपास पोहोचले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर बँकेने आपला नेट एनपीए सलग दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी ०% राखण्यात यश मिळवले असून ग्रॉस एनपीए सुद्धा ५%चे आत ४.४२% पर्यंत खाली आणला आहे. वार्षिक सभेत मान्यता घेऊन सभासदांना लाभांश वाटप करण्यात येणार आहे. या यशाबद्दल माजी आ.अशोकर काळे, आ. आशुतोष काळे यांनी बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी व अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

COMMENTS