Homeकृषी

सद्गुरू  कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात  

कर्जत : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन

अनेक आजारांवर हसणे हेच औषध : डॉ. जोशी
ट्रस्टच्या जागेवरील तारेचे कंपाऊंड तोडून ताबा मारणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी
शासकीय ताफ्यात कपात; दोनच वाहनांचा वापरपंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला पालकमंत्र्यांचा प्रतिसाद


कर्जत : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे होते. यावेळी प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सचिन आढाव, प्रा. डॉ. प्रियंका दहिवळे, डॉ. प्रियंका जाधव, प्रा. महेश कुतुवळ, प्रा. वैभव शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. बाळासाहेब पारखे तसेच प्रा. तेजस गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व, जलसंधारण, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकास या विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
सदगुरु कृषी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे आवश्यक असल्याचे मत प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. उके यांनी मानले.

COMMENTS