Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा : माजी आ.स्नेहलता कोल्हे

कोपरगाव : मतदारसंघातील विविध गावांमध्ये सोमवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काढणीस आलेली पिके पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून,महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून समस्त शेतकरी बांधवांना शासकीय मदतीचा हात देण्यासाठी सहकार्य करावे, मात्र शासनाचे आदेश येण्याची वाट पाहण्याआधी अधिकाऱ्यांनी आजच स्थानिक परिस्थिती वरिष्ठ स्तरावर अवगत करावी अशी मागणी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, सध्या कोपरगाव तालुक्यासह पुणतांब्यासह परिसरातील चितळी,वाकडी व इतर गावांच्या विविध भागातील देखील शेतीचे नुकसान झाले आहे.  काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा, टरबूज, आंबा, द्राक्षे तसेच इतर फळबाग पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  या वादळ वाऱ्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी जनावरांसाठी लागवड करण्यात आलेली मका व चारा पिके देखील पूर्णपणे नष्ट झालेले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे. या प्रसंगामुळे संपूर्ण शेतकरी बांधव अतिशय हतबल झालेले असून त्यांना शासकीय मदत तात्काळ मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतामध्ये जाऊन पाहणी करून पंचनामे करण्याकामी योग्य ते पाऊले उचलले पाहिजे असे त्या म्हणाल्या. काही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतात बारदानाखाली साठवून ठेवलेला गहू व हरभरा अक्षरशः भिजल्याने शेतकऱ्यांवर मोठे अस्मानी संकट ओढवले आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

रोहमारे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
रयतच्या उत्तर विभागाच्या ४३९ विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ मध्ये शिष्यवृत्ती
‘संजीवनी’चा कृष्णा नवले सीबीएसई दहावी परीक्षेत प्रथम; १०० टक्के निकालाची परंपरा कायम; ५८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

कोपरगाव : मतदारसंघातील विविध गावांमध्ये सोमवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काढणीस आलेली पिके पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून,महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून समस्त शेतकरी बांधवांना शासकीय मदतीचा हात देण्यासाठी सहकार्य करावे, मात्र शासनाचे आदेश येण्याची वाट पाहण्याआधी अधिकाऱ्यांनी आजच स्थानिक परिस्थिती वरिष्ठ स्तरावर अवगत करावी अशी मागणी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, सध्या कोपरगाव तालुक्यासह पुणतांब्यासह परिसरातील चितळी,वाकडी व इतर गावांच्या विविध भागातील देखील शेतीचे नुकसान झाले आहे.  काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा, टरबूज, आंबा, द्राक्षे तसेच इतर फळबाग पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  या वादळ वाऱ्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी जनावरांसाठी लागवड करण्यात आलेली मका व चारा पिके देखील पूर्णपणे नष्ट झालेले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे. या प्रसंगामुळे संपूर्ण शेतकरी बांधव अतिशय हतबल झालेले असून त्यांना शासकीय मदत तात्काळ मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतामध्ये जाऊन पाहणी करून पंचनामे करण्याकामी योग्य ते पाऊले उचलले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

काही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतात बारदानाखाली साठवून ठेवलेला गहू व हरभरा अक्षरशः भिजल्याने शेतकऱ्यांवर मोठे अस्मानी संकट ओढवले आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

COMMENTS