Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला भेट

मुंबई : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मुख्यालयाला भेट देत प्रतिष्ठित 'NSE बेल' वाजवली. यावेळी त्या

कच्च्या तेलाच्या किमती 17 टक्क्यांनी घसरल्या
ट्रम्पच्या नेतृत्वाखाली भयगंड महासत्ता!
महागाईचा भडका उडणार? सावधान! लवकरच महागणार पेट्रोल-डिझेल

मुंबई : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मुख्यालयाला भेट देत प्रतिष्ठित ‘NSE बेल’ वाजवली. यावेळी त्यांनी NSE च्या कामकाजाची माहिती घेत भारतीय वित्तीय व्यवस्थेची पाहणी केली.

मुंबईतील बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी गुरुवारी शिष्टमंडळासह भेट दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी NSE चे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी इंजेटी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची भारतातील ही पहिली अधिकृत भेट आहे. त्यांनी भारतीय वित्तीय क्षेत्राशी संवादासाठी NSE ची निवड केल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत आणि व्हिएतनाम हे दोन्ही देश उत्पादन, तंत्रज्ञान आणि भांडवली बाजाराच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहेत.

फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतातील उत्पादन प्रकल्पासाठी भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या १८ महिन्यांत पहिल्या वाहनाचे उत्पादन सुरू झाले आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १६ अब्ज डॉलरच्या पुढे गेला असून २०३० पर्यंत तो २५ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि व्हिएतनामी प्रतिनिधीमंडळाने NSE च्या ट्रेडिंग व ऑपरेशन्स सुविधांची पाहणी केली.

COMMENTS