Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमय्याच्या आक्षेपार्ह व्हिडिओवरून गदारोळ

सखोल चौकशी करणार ः उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह परिस्थितील व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरू झाल्याचे दिसून

महाविकास आघाडीचे नेते ड्रग्ज प्रवक्ते बनलेत- किरीट सोमय्या (Video)
हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे सरकार…भाजपचा ठाकरे सरकारवर ठपका
किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह परिस्थितील व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. याचे पडसाद मंगळवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटल्याचे दिसून आले. सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या पटलावर पेन ड्राईव्ह ठेवला आहे. यात सर्व पुरावे असून या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.  भास्कर जाधव यांनी सोमय्यांना क्लीन चीट देणार का? म्हणून थेट देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे.
वेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले कि, ’काही भाजप नेत्यांनी ईडी, सीबीआयची भीती दाखवून अनेक महिलांना ब्लॅकमेल केले आहे. या नेत्याला सीआयएसएफची सुरक्षा आहे. या सुरक्षेचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो. माझ्याकडे सोमय्यांचे 8 तासांचे व्हिडिओ आहेत ते मी सभापतींकडे देणार आहे. असा हा भाजपचा नेता म्हणजे किरीट सोमय्या. माझ्याकडे या देशद्रोही नेत्यांच्या व्हिडिओचा पेनड्राईव्ह आहे. या नेत्याला सत्ताधारी संरक्षण देणार का? की त्यांच्यावर कारवाई करणार’ असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. तर माझे ईडीशी संबध आहेत असे सांगुन महिलांचे शोषण केले जाते. तर अशा काही घटना माझ्यासमोर आल्या आहेत, असेही यावेळी बोलताना दानवे म्हणाले आहेत. तर या प्रकरणाचे माझ्याकडे काही व्हिडीओ आले आहेत असे म्हणत दानवेंनी ते व्हिडीओ असलेले पेन ड्राईव्ह उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्याकडे दिले आहे. तर या नेत्याला चांगल्या प्रकारची सुरक्षा आहे. ती काढुन त्यांच्यावर कारवाई करणार का? असे दानवे म्हणालेत.
यावर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाची संपूर्ण आणि सखोल चौकशी करणार असून कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. या प्रकरणी कोणाकडे माहिती असल्यास तक्रार करण्याची विनंती देखील त्यांनी केली. राज्याच्या राजकारणात या कथित सीडीवरुन आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने किरीट सोमय्या यांची बाजू घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्याबाबत कुठल्याही महिलेने कुठलीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरू असल्याचा आमचा थेट आरोप आहे. कुठल्या महिलेचा त्यावर काही आक्षेप नाहीये कुठली तक्रार प्राप्त नाही. केवळ आणि केवळ त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान आहे, हे स्पष्टपणे पाहायला मिळते. कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावण्याची गरज नाही असे संजय शिरसाठ म्हणाले. ते शिवसेनेच प्रवक्ते आहेत. ज्याने कोणी हे सगळे काम केलेले आहे. त्या सगळ्यांना आमचे एवढच म्हणणे आहे की, बाबा तुम्ही सावध राहा. भविष्यामध्ये तुमच्या सीडी येऊ शकतात. ठाकरे गटाला मला सावध करायचे आहे. त्यांनी आता संभाळून राहावे, त्यांचाही नंबर लागू शकतो. दानवे तुम्ही हीच कामे करा, सीडी काढा, —-काढा असे संजय शिरसाठ म्हणाले.  धारावी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. त्यात लोकांना फायदा होईल. लोकहिताचा निर्णय घेतला जाईल., कितीही खोके बोके करा, सरकार स्थिर आहे. विरोधकांना कामधंदे नाहीत अशी टीका संजय शिरसाठी यांनी केली.

सूमोटोअंतर्गत कारवाई करा ः आ. यशोमती ठाकूर – भाजप नेते तथा माजी खासदार यांचा अश्‍लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले आहेत. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारकडे, किरीट सोमय्यांवर सूमोटोअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिलांना सूमोटो अंतर्गत संरक्षण देणार आहात की नाही?, असा सवाल राज्य सरकारला केला आहे. ज्या वृत्तवाहिनींने किरीट सोमय्यांचा पर्दाफाश केला, त्या पत्रकारांना आणि वृत्तवाहिन्यांला संरक्षण देणार का? की, बीबीसीवर जशी अरेरावी केली. तशी धाड टाकून जो मुळ मुद्द्याला बगल देणार का? महिलांना ब्लॅकमेल करण्याचा मुद्दा सरकार लावून टाकणार आहे का? आता करी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर कडक कारवाई करण्याची गरज आहे आणि ते कारवाई करणार आहे की नाही करणार?, असा सवाल केला आहे.

COMMENTS