लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात धूत ट्रान्समिशन प्रा. लि. या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीचा कॅम्पस इंटरव्ह्यू नुकताच उत्साहात पार पडला. या भरती प्रक्रियेत एकूण १८३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तब्बल १०२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार यांनी दिली.कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांची लेखी व मौखिक परीक्षा घेण्यात आली. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना निवडीची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी स्वप्ना देशपांडे आणि संदीप काथार यांनी विद्यार्थ्यांना कंपनीची कार्यपद्धती, औद्योगिक वातावरण आणि करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे आप्पासाहेब शेळके, डॉ. हरिभाऊ दुबे आणि डॉ. राजेंद्र गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कंपन्यांशी सामंजस्य करार, माजी विद्यार्थ्यांचा समन्वय आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला जात असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे आणि उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार यांनी अभिनंदन केले.

COMMENTS