Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल  

कोपरगाव :  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा इ. १० वीचा (सीबीएसई) १०० टक्के निकाल लागला. स्वरीत भूषण

‘सनराईज’चा बारावीचा १०० टक्के निकाल
लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलचा 100% निकाल; 10 वी सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांची गौरवशाली कामगिरी
शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डात 100 टक्के निकाल!

कोपरगाव :  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा इ. १० वीचा (सीबीएसई) १०० टक्के निकाल लागला. स्वरीत भूषण भळगाटी याने ९७.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने फेब्रुवारी व मार्च २०२६ मध्ये या परीक्षा घेतल्या होत्या. संजीवनी इंटरनॅशनल स्कूलने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतर सर्व क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या परीक्षेमध्ये साची विरेश अग्रवाल हीने ९६ टक्के गुण मिळवत दुसरा, जुई अजित पाटील हीने ९४.४० टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला. दर्श पवन भुतडा व पृथ्वीराज माळवदे यांनी अनुक्रमे ९४ व ९३.६० टक्के गुण मिळवुन चौथा व पाचव्या क्रमांकावर आपले शिक्कामोर्तब केले.  
केवळ गुणपत्रिकेवरील गुण आजच्या स्पर्धात्मक युगात पुरेसे ठरत नाहीत तर यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्ये, सकारात्मक मूल्ये आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास अत्यावश्यक ठरतो. याच दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव रुजविण्यासाठी शाळेत विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात.  
 विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे, डायरेक्टर ऑफ स्कूल ऑडीट सुंदरी सुब्रमण्यम व प्राचार्या शैला झुंजारराव यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS