कोपरगाव : जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्या अंजली ईश्वर साळुंके हिने ९३ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. यंदाही संजीवनीच्या कॉमर्स व सायन्स शाखेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे, सदर परीक्षेत वाणिज्य शाखेत ओम अजय बजाज याने ९०.५० टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक तर रिद्धी रोहम हिने ८९.१७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. क्षितिजा शांतीलाल होन हिने ८८.५० टक्के व विनाशा गुजराथी हिने ८५.५० टक्के गुण मिळवत अनुक्रमे ४ था व ५ वा गुणानुक्रमांक प्राप्त केला. विज्ञान शाखेत शौर्य संतोष थोरात याने ८७ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर समृद्धी विजय शेळके व वैभव नारायण लचके यांनी अनुक्रमे ८३.३३ व ८२.३३ टक्के गुण मिळवत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने उत्तिर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हेच संजीवनी ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख ध्येय असून शैक्षणिक गुणवत्तेसोबत नैतिक मूल्ये, शिस्त, कौशल्य विकास आणि सामाजिक जाणीव यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. विविध उपक्रम व सुविधा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे व प्राचार्या रेखा साळुंके यांचाही गौरव करण्यात आला.

कोपरगाव : जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्या अंजली ईश्वर साळुंके हिने ९३ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. यंदाही संजीवनीच्या कॉमर्स व सायन्स शाखेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे, सदर परीक्षेत वाणिज्य शाखेत ओम अजय बजाज याने ९०.५० टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक तर रिद्धी रोहम हिने ८९.१७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. क्षितिजा शांतीलाल होन हिने ८८.५० टक्के व विनाशा गुजराथी हिने ८५.५० टक्के गुण मिळवत अनुक्रमे ४ था व ५ वा गुणानुक्रमांक प्राप्त केला.
विज्ञान शाखेत शौर्य संतोष थोरात याने ८७ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर समृद्धी विजय शेळके व वैभव नारायण लचके यांनी अनुक्रमे ८३.३३ व ८२.३३ टक्के गुण मिळवत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने उत्तिर्ण झाले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हेच संजीवनी ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख ध्येय असून शैक्षणिक गुणवत्तेसोबत नैतिक मूल्ये, शिस्त, कौशल्य विकास आणि सामाजिक जाणीव यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. विविध उपक्रम व सुविधा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे व प्राचार्या रेखा साळुंके यांचाही गौरव करण्यात आला.

COMMENTS