Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऋषिकेश सोनटक्के यांची कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञपदी निवड

पाथर्डी : पाथर्डी शहरातील कसबा पेठ येथील ऋषिकेश उर्फ हरीश रामभाऊ सोनटक्के याची  महाराष्ट्र शासनाच्या वीजनिर्मिती विभागात कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ पदी निवड झाली आहे.या पदासाठी बँकिंग कर्मचारी निवड संस्था यांच्यामार्फत परीक्षा घेण्यात आली होती.   ऋषिकेश सोनटक्के हा गेल्या अनेक वर्षांपासून पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता परंतु प्रत्येक वेळी थोड्या फरकाने त्याला यश हुलकावणी देत होते. तरी खचून न जाता त्याने अभ्यासात सातत्य राखून  अथक मेहनत आणि चिकाटीने यश संपादन केले त्यांच्या या खडतर प्रवासात त्याला त्यांच्या परिवारातील सदस्यांनी मोलाची साथ दिली.  झालेल्या निवडीवर समाधान न मानता आगामी काळातही स्पर्धा परीक्षेची तयारी कायम ठेवत मोठे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस यावेळी ऋषिकेश सोनटक्के याने बोलून दाखवला.

प्रकल्प स्पर्धेतून विद्यार्थ्यांना नवसंशोधनाची संधी : उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ
ऋतुजा अशोकराव गायकवाड हिचा समस्त माळी पंच मंडळी राहाता व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार; यूपीएससी स्पर्धा परीक्षेत देशात १०६ वा क्रमांकावर
शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन उत्साहात संपन्न

पाथर्डी : पाथर्डी शहरातील कसबा पेठ येथील ऋषिकेश उर्फ हरीश रामभाऊ सोनटक्के याची  महाराष्ट्र शासनाच्या वीजनिर्मिती विभागात कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ पदी निवड झाली आहे.या पदासाठी बँकिंग कर्मचारी निवड संस्था यांच्यामार्फत परीक्षा घेण्यात आली होती.

  ऋषिकेश सोनटक्के हा गेल्या अनेक वर्षांपासून पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता परंतु प्रत्येक वेळी थोड्या फरकाने त्याला यश हुलकावणी देत होते. तरी खचून न जाता त्याने अभ्यासात सातत्य राखून  अथक मेहनत आणि चिकाटीने यश संपादन केले त्यांच्या या खडतर प्रवासात त्याला त्यांच्या परिवारातील सदस्यांनी मोलाची साथ दिली.

 झालेल्या निवडीवर समाधान न मानता आगामी काळातही स्पर्धा परीक्षेची तयारी कायम ठेवत मोठे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस यावेळी ऋषिकेश सोनटक्के याने बोलून दाखवला.

COMMENTS