Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महेश आहेर यांच्या केबिनमध्ये पैशांची थप्पी

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला व्हिडिओ

मुंबई/प्रतिनिधी ः महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये पैशांची थप्पी असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्ह

नव्या राज्यपालांचा आज शपथविधी
फौजदाराचे घर भरदिवसा फोडून लाखोंची चोरी | DAINIK LOKMNTHAN
नगरमध्ये इन्कम टॅक्सच्या छापेमारीने चर्चेला उधाण

मुंबई/प्रतिनिधी ः महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये पैशांची थप्पी असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला आहे. आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप काल व्हायरल झाली होती. आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा यात उल्लेख असल्याने खळबळ उडाली होती. ही क्लिप आहेर यांची असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लिहले की, महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे म्हाडसे ह्या व्हिडीओमध्ये पैसे मोजताना दिसत आहेत. यामुळे आता प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याबाबतचा उल्लेख आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर आव्हाड यांच्या समर्थकांनी महेश आहेर या अधिकार्‍याला मारहाण केली. या क्लिपबाबत जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला होता. त्यांनी माध्यमांशीही यासंदर्भात संवाद साधला होता. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनीटांनी जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर यांच्यासह आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेच्या गेटवर हा हल्ला केला. ठाणे मनपामध्ये अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले महेश आहेर हे कामकाज संपल्यानंतर घरी निघाले होते. त्याच वेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला.

मनपाच्या सहायक आयुक्तांवर प्राणघातक हल्ला – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावायाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणात आरोप करत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेतील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS