Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंथन परीक्षेत श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे यश  

श्रीगोंदा : येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय यांनी शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत मंथन रा

बसस्थानक उभारणीत नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष; आ. आशुतोष काळे ; काँक्रिटीकरण कामास प्रारंभ 
ब्राह्मणवाडा येथील ब्रिटिशकालीन विश्रामागृह वणव्यात खाक
सावधान! शिर्डीत गाडीची काच फोडून चोरी करण्याची नवी पद्धत आली समोर, साईभक्तांनी सतर्क राहण्याचे आवाहन

श्रीगोंदा : येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय यांनी शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यालयातील इयत्ता सातवीतील 12 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी पवार प्रणव दत्तात्रय याने 220 गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला तसेच तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून विशेष कामगिरी केली. त्याच्या या यशामुळे विद्यालयाचा गौरव उंचावला आहे.
तसेच इयत्ता सहावीतील 13 विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत सहभाग नोंदविला. त्यामध्ये भारती प्रज्वल मच्छिंद्र याने 164 गुण मिळवत केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाची परंपरा कायम राखली. इतर विद्यार्थ्यांनीही समाधानकारक गुण मिळवत चांगली कामगिरी केली असून एकूण निकाल उल्लेखनीय ठरला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव राजेंद्र नागवडे, अध्यक्ष अनुराधा नागवडे, निरीक्षक बी. के. लगड, ऑडिटर सुभाष भापकर, विलास ठाणगे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदकर बी. बी. यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षक व सेवकवृंद यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची आवड निर्माण होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा लौकिक अधिकच वृद्धिंगत झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS