Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शुभम थोरातला एमबीबीएस पदवी  

सुपा : पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी येथील शुभम अरुण थोरात याने एमबीबीएस पदवी संपादन करत आपल्या कुटुंबाचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले.  शुभम हा

राज्य शिक्षकेतर महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी कुरुमकर  
प्रज्ञाशोध परीक्षेत समर व सक्षम यशस्वी
सुनील जोशी यांना ब्राह्मण महासंघाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

सुपा : पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी येथील शुभम अरुण थोरात याने एमबीबीएस पदवी संपादन करत आपल्या कुटुंबाचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले.  
शुभम हा मेजर अरुण ज्ञानदेव थोरात यांचा मुलगा असून वडिलांच्या देशसेवेच्या पार्श्वभूमीवर त्याला लहानपणापासून जिद्द, चिकाटी आणि शिस्तीचे संस्कार मिळाले. त्याचे पहिले ते बारावीपर्यंतचे शिक्षण केंद्रीय विद्यालय, पंजाब येथे झाले. त्यानंतर नीट परीक्षा उत्तीर्ण होत त्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संभाजीनगर येथे प्रवेश मिळविला.
 कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर शुभमने एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत पदवी प्राप्त केली. त्याच्या यशामागे आई-वडिलांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले जाते. गावचे सरपंच पंडित थोरात, किसन मांडगे, डी.एन. थोरात, रघुनाथ चहाळ, लालकृष्ण भालशिंग, पारनेर दूध संघाचे रामचंद्र मांडगे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, पत्रकार राजकुमार इकडे तसेच पंचक्रोशीतील विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व नागरिकांनी शुभम थोरात याचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS