Homeताज्या बातम्या

नशा ही तरुणाईच्या भविष्याला लागलेली कीड; पोलीस निरीक्षक गायकवाड यांचे प्रतिपादन, कर्जतमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम

कर्जत: अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंब आणि समाजावर गंभीर परिणाम करणारे संकट असून विद्यार्थ्यांनी अ

आंबीत धरण ओव्हरफ्लो! मुळा नदीला नवसंजीवनी; भंडारदरा धरणातही नव्याने पाण्याची आवक
‘वृद्धेश्वर’वर आ. राजळेंची तर ‘मुळा’वर गडाखांची एकहाती सत्ता; साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे निर्विवाद वर्चस्व
लोकमंथन इफेक्ट: चहाच्या पाकिटावर आता उत्पादन दिनांकासह मुदतही स्पष्ट; श्रीगोंद्यातील बातमीचा मोठा परिणाम

कर्जत: अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंब आणि समाजावर गंभीर परिणाम करणारे संकट असून विद्यार्थ्यांनी अशा व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा व सकारात्मक उपक्रमांकडे लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी केले.

“नशा मुक्त भारत” अभियानांतर्गत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून दि. २७ जून रोजी कर्जत पोलीस स्टेशनच्या वतीने कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र थोरात, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे, मनोज मुरकुटे आणि रवींद्र लगड, विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल केरूळे व शिक्षक यांनी उपस्थित राहून शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षक वृंद यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती देत जनजागृती केली.

व्यसनामुळे गुन्हेगारीकडे वाटचाल होण्याची शक्यता

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य बिघडते, मानसिक संतुलन ढासळते, कुटुंबात तणाव निर्माण होतो तसेच अनेकदा गुन्हेगारीकडे वाटचाल होण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर राहून स्वतःच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सजग राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली असून “नशा मुक्त भारत” अभियानाचा संदेश विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला आहे.

COMMENTS