मुंबई : मुंबईतील सुमन नगर, चेंबूर येथे शनिवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्प

मुंबई : मुंबईतील सुमन नगर, चेंबूर येथे शनिवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, प्रवीण मोरे, विशाल तूपसुंदर, रवि गायकवाड, संजय डोळसे, रमेश घोक्षे, नंदू साठे, महादेव साळवे, सुनील सदाफुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

COMMENTS