Homeताज्या बातम्या

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शालेय साहित्य वाटप करून साजरी

राकेश साळवे यांचा सामाजिक उपक्रम; ’लेखणी प्रेरणा दिन’ सर्वांनी साजरा करावा, असे आवाहन माजलगाव : लोकशाहीर तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या

अतिवृष्टीच्या अनुदानात अफरातफर
आजचे राशीचक्र मंगळवार,०७ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
कर्तव्यनिष्ठतेचा असाही परिपाठ !

राकेश साळवे यांचा सामाजिक उपक्रम; ’लेखणी प्रेरणा दिन’ सर्वांनी साजरा करावा, असे आवाहन

माजलगाव : लोकशाहीर तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) वतीने विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. तालुकाध्यक्ष राकेश साळवे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम मूकबधिर विद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, तसेच ज्ञानाई गुरुकुल हॉस्टेल येथे पार पडला.

यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमादरम्यान राकेश साळवे सह मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविकात बोलताना राकेश साळवे म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ दीड दिवस शालेय शिक्षण घेतले, मात्र आपल्या असामान्य लेखणीच्या बळावर त्यांनी मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण केले. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्याद्वारे प्रभावीपणे मांडल्या. त्यांचे विचार आणि साहित्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांची जयंती केवळ जयंती म्हणून नव्हे, तर ’लेखणी प्रेरणा दिन’ म्हणून सर्वांनी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला विजयदादा साळवे, डॉ. यशवंतराजे भोसले, पत्रकार उमेश मोगरेकर, कमलेश जाब्रस, विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ ससाणे, परमेश्वर सोळंके, बाळासाहेब आडागळे, निखिल वाघमारे, अमर साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवक तालुकाध्यक्ष अमित खर्डे, नितीन गायकवाड, प्रसाद अवचार, नामदेव पांचाळ आणि सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक जाणीव, शिक्षणाबद्दलची बांधिलकी आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मनापासून स्वागत करून राकेश साळवे व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्याचे कौतुक केले.

COMMENTS