Homeताज्या बातम्या

संघर्षाला मिळाले यशाचे फळ; सुरज तेलंगे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड

नांदेड : बोरगाव (आ.) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सुरज गोविंदराव तेलंगे यांची महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये निवड झाली असून, त्यांच्या या यशा

उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा ‘पर्यावरण वारी’ उपक्रम यशस्वी; ५ लाख कापडी पिशव्या व स्टील बाटल्यांचे वाटप
माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेत शेतकर्‍यांना मार्गदर्शन; सोयाबीन पिकासाठी विषमुक्त शेतीचा संदेश
मेळघातात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार; अवघ्या १५ दिवसांच्या नवजात बालिकेच्या पोटावर दिले चटके!

नांदेड : बोरगाव (आ.) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सुरज गोविंदराव तेलंगे यांची महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, अनेक अडचणी आणि सततच्या संघर्षाचा सामना करत सुरज तेलंगे यांनी आपल्या जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. अनेक वेळा परिस्थितीने त्यांची परीक्षा घेतली; मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही. संघर्ष हा यशाचा पाया असतो हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. समाजसेवेची आवड जपत त्यांनी युवकांना शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देण्याचे कार्य सातत्याने केले.

आता महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड होऊन त्यांनी स्वतःचे व आपल्या गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुरज गोविंदराव तेलंगे यांचा हा यशोगाथेचा प्रवास आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

COMMENTS