Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला पोलिस अधिकार्‍याला 28 लाखांची लाच घेताना अटक

पुणे : शहर पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका महिला अधिकार्‍याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभा

गोरेगाव ‘नेस्को’ ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; बॉलिवूड कनेक्शन उघड, सीसीटीव्हीमुळे खळबळ!
डी-मार्ट तिहेरी हत्याकांडाचा तपास वेगात; आश्रयदात्यांवरही पोलिसांनी फास आवळला;आणखी 2 आरोपी जेरबंद; मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप फरार
अरिजितसिंग चव्हाण खून प्रकरण : साईलाला व इंगळे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी
महिला API ने मागितली 28 लाखाची लाच, ACB ने रचला सापळा; पुण्याच्या  आयुक्तालयात रंगेहात पकडलं | पुणे बातम्या (Pune News) - News18 Marathi

पुणे : शहर पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका महिला अधिकार्‍याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, प्रामाणिक तपास प्रक्रियेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ही कारवाई पुणे पोलिस आयुक्तालय परिसरातच एका खासगी ठिकाणी करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार या संबंधित प्रकरणात लाच स्वीकारताना पकडल्या गेल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूर्वनियोजित सापळा रचून ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. ही घटना शहरातील एका नामांकित औद्योगिक कंपनीशी संबंधित फसवणूक प्रकरणाशी निगडित आहे. संबंधित कंपनीने गुंतवणूकदारांना दरमहा पाच टक्के परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुमारे 43 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवणूकदारांकडून उकळण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची जबाबदारी वैशाली तोटेवार यांच्याकडे होती. त्यांनी स्वतः फिर्यादी म्हणूनही भूमिका बजावली होती. तपासादरम्यान सुमारे 30 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली होती. तपास प्रक्रियेत मदत करण्यासाठी किंवा तपासाची दिशा बदलण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी 28 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ सापळा रचला. नियोजित योजनेनुसार संबंधित अधिकार्‍यांना रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाई इतक्या धाडसी पद्धतीने करण्यात आली की, ती पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातच पार पडली. विशेष म्हणजे, संबंधित अधिकार्‍यांची नुकतीच दुसर्‍या ठिकाणी बदली झाली होती आणि त्यांना पूर्वीच्या पदावरून कार्यमुक्तही करण्यात आले होते. तरीदेखील त्या आयुक्तालयात येऊन लाच स्वीकारत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

COMMENTS