Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

माहूर तालुक्यात जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी तहसीलदार -जगताप

नाशिक येथील कुप्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदूबाबांचे वाढते जाळे आणि त्यातून होणारे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण याविरोध

माका येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. गायकवाड रुजू
भीषण अपघातात जामखेडच्या दोन तरुणांचा मृत्यूमाहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील दुर्घटना; एक गंभीर
नामस्मरणाची शिदोरीच जीवनाला खरी दिशा देते : ह.भ.प. लोंढे



नाशिक येथील कुप्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदूबाबांचे वाढते जाळे आणि त्यातून होणारे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण याविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
माहूर तालुक्यात जादूटोणा विरोधी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, माहूरच्या वतीने तालुका अध्यक्ष मनोज किर्तने आणि पदाधिकार्‍यांनी 30 मार्च 2026 रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन तालुक्यात वाढणार्‍या भोंदूगिरीविरोधात कारवाईची मागणी केली होती. या निवेदनाची तातडीने दखल घेत तहसीलदार अभिजित जगताप यांनी पंचायत समिती प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाने तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना जादूटोणा विरोधी कायदा 2013 अंतर्गत भोंदूगिरीच्या प्रकरणांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. भोंदूबाबांकडून दैवी चमत्काराचा दावा करून विशेषतः महिलांना जाळ्यात अडकवले जात असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.  या समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाची कठोर भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आला. मात्र आजही अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचे चित्र कायम आहे. माहूर प्रशासनाच्या या निर्णयामुळे भोंदूबाबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा आणि भोंदूगिरी समूळ नष्ट करण्यासाठी केवळ कायदा पुरेसा नाही, तर जनतेचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशासनाच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असून शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब जनतेने भोंदूबाबांच्या आहारी जाऊ नये.
– अभिजित जगताप

COMMENTS