शेवगाव : शहरातील खाटीक गल्ली परिसरात गोमांसाची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेवगाव पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १७० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, खाटीक गल्ली येथे काही व्यक्ती गोमांस विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. छाप्यात संशयित आरोपीकडून गोमांस साठा जप्त करण्यात आला.या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे हजारो रुपयांमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले.कारवाईदरम्यान काही साहित्यही जप्त करण्यात आले असून त्यामध्ये वजनकाटा, चाकू, लोखंडी साखळी आदींचा समावेश आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.

COMMENTS