Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये पुन्हा हरिहर किल्ल्यावर पर्यटकांवर हल्ला

नाशिक : हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला अडवून मारहाण आणि दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर-घोटी मार्गा

वडमाऊली विद्या प्रसारक मंडळ संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; संस्थापक व मातोश्रींच्या प्रतिमेचे पूजन
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन
कड्यात संविधान प्रेमी व सामाजिक संघटनेच्या वतीने शांततापूर्ण निषेध रॅली! केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला; गाडीचा पाठलाग करत तोडफोड, १०  जणांविरोधात गुन्हा

नाशिक : हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला अडवून मारहाण आणि दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर-घोटी मार्गावरील बोरीची वाडी परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मोटरसायकलला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वावी हर्ष परिसरात गाडी अडवून चालक आणि प्रवाशांना काठी तसेच चापटीने मारहाण करण्यात आल्याची फिर्याद आहे. या प्रकरणी १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS