Homeताज्या बातम्या

कुकडी कालव्यात स्त्री-पुरुषाचे मृतदेह आढळले

कर्जत : तालुक्यातील कुकडी कालव्यात एका स्त्री व एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांचीही ओळख अद्याप पटलेली नसून कर्जत

तरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बरखास्त
श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
कर्जत तालुक्यात डिजिटल जनगणनेस प्रारंभ
Junnar Taluka: कुकडी डाव्या कालव्यात पडलेल्या नव दाम्पत्याचा शोध; ४० तासांनी मृतदेह सापडले Pune Marathi News | Search underway for newlywed couple who fell into Kukadi left canal; Bodies ...


कर्जत : तालुक्यातील कुकडी कालव्यात एका स्त्री व एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांचीही ओळख अद्याप पटलेली नसून कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सध्या तालुक्यात कुकडी कालव्याचे आवर्तन सुरू असून कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. येसवडी चारीमध्ये कुळधरण व पिंपळवाडी शिवारादरम्यान पाण्यातून वाहत येणारे स्त्री व पुरुषाचे मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांनी याबाबत कर्जत पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. मृत स्त्रीचे वय सुमारे ५० वर्षे, तर पुरुषाचे वय सुमारे ५५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून ते कुठून वाहत आले, मृत्यूचे कारण काय आहे, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कर्जत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती मिळाली.

COMMENTS