Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

बिहारमध्ये चेंगराचेंगरी, 9 भाविकांचा मृत्यू; नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिरातील घटना

नालंदा : बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिरात मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून य

नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी …
आपत्तीचे दशक की हतबलता?
पवारांचे संभ्रमाचे राजकारण

नालंदा : बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिरात मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात 8 महिलांचा समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्या एका पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत सहापेक्षा अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
चैत्र महिन्यातील शीतला अष्टमीच्या निमित्ताने मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळली होती. परिसरात जत्राही भरली होती. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत पुरेशा सुरक्षेची आणि नियंत्रणाची व्यवस्था नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मंदिराचे गर्भगृह लहान असल्यामुळे भाविकांमध्ये लवकर दर्शन घेण्याची चढाओढ सुरू झाली. रांगेचे नियोजन नसल्याने धक्काबुक्की वाढली आणि काही क्षणांतच परिस्थिती हाताबाहेर गेली. गर्दीत अनेक महिला खाली पडल्या आणि त्यांच्यावरूनच इतरांचा ओघ चालू राहिल्याने चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, एका महिलेला चक्कर येऊन ती पडल्याने गोंधळ अधिक वाढला. तिला उचलण्याच्या प्रयत्नात गर्दी विस्कळीत झाली आणि अचानक मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील काही मृतांची ओळख पटली असून त्यात रीता देवी, कांती देवी, आशा देवी, देवंती देवी, अनुष्का देवी आणि रेखा देवी यांचा समावेश आहे. मृतांपैकी बहुतांश नालंदा परिसरातील असून इतर काही शेजारच्या जिल्ह्यांतील आहेत. एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेनंतर परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाल सुरू केली आहे. पटना येथील वरिष्ठ अधिकार्‍यांना नालंदा येथे पाठवण्यात आले असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना सहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, तर केंद्र सरकारकडून दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.


मदतकार्य उशिरा पोहोचल्याची तक्रार
अपघातानंतर मदतकार्य वेळेत पोहोचले नाही, अशी तक्रार भाविकांनी केली आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी सुमारे चाळीस मिनिटे लागल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, मात्र आवश्यक मनुष्यबळ आणि रुग्णवाहिका उशिरा आल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. ही दुर्घटना केवळ अपघात नसून धार्मिक स्थळांवरील गर्दी व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींचे उदाहरण ठरत आहे. योग्य नियोजन, पुरेसा पोलीस बंदोबस्त, रांग व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचा अभाव अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

COMMENTS