Homeताज्या बातम्या

‘गुंगी गुडीया’ वक्तव्याचे राज्यभरात पडसाद

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडीया' या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. मुंबई आण

अहिल्यानगर जिल्ह्यातील ७५ हजार ६७१ शिधापत्रिका धारकांचे सवलतीचे धान्य बंद
एसटीचे सवलत स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट; अकोलेत शिबिरे आयोजित करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी
फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण अन् ढोल-ताशांच्या गजरात आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस साजरा
Sunetra Pawar Oath Ceremony: महाराष्ट्र में 1978 में पहली बार उपमुख्यमंत्री  पद सृजित, 31 जनवरी को पद संभालने वाली पहली महिला होंगी सुनेत्रा पवार?

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडीया’ या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक तसेच नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे आणि शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनानंतर काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ताओंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्राचा निषेध करत प्रतीकात्मक आंदोलन केले.

सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रालयाबाहेर मूक आंदोलनाची घोषणा केली होती. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून अनेक कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात निषेध नोंदवला. नागपुरात मध्यवर्ती चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध केला.

नेमकी वादाची पार्श्वभूमी काय? बीड दौऱ्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले नाही, तर त्यांच्या शेजारी उपस्थित असलेल्या धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करत पत्रकारांना रोखले. या घटनेचा संदर्भ देत काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्याबाबत ‘गुंगी गुडीया’ हा शब्दप्रयोग करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत राज्यभर आंदोलनाची भूमिका स्वीकारली असून, या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

COMMENTS