Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एसएसजीएम’मध्ये माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक उत्साहात; आमदार विवेक कोल्हे यांच्यासह मान्यवरांचे अभिनंदन

कोपरगाव : येथील सद्गुरु गंगागिरीजी महाराज (एसएसजीएम) महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या ब

धानोरेतील गौण खनिजावर ‘डल्ला’? ‘जलजीवन’च्या तळ्यातील दगड-डबराचा गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
लाल बहादूर शास्त्री विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात; ३१ वर्षांनंतर वर्गमित्र एकत्र
शेवगावात सैनिक परिवार स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक माजी सैनिक व कुटुंबीयांची उपस्थिती

कोपरगाव : येथील सद्गुरु गंगागिरीजी महाराज (एसएसजीएम) महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत श्रद्धांजली, अभिनंदन प्रस्ताव तसेच आगामी उपक्रमांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या पत्नी कै. शशिकला रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय जबाबदाऱ्या प्राप्त झालेल्या मान्यवरांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.

युवा नेते आमदार विवेक कोल्हे यांची विधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सभेत अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी व व्हा. चेअरमन पदी ॲड. भगीरथ शिंदे यांची, तर मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी ॲड. संदीप वर्पे व सुरेश बोळीज यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

याच बैठकीत महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. संतोष पवार यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘नारायण सुर्वे पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. या बैठकीस माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, उपाध्यक्ष दिलीप दारुणकर, खजिनदार डॉ. रामदास पवार, सचिव प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्यासह ॲड. संदीप वर्पे, सुनील गंगुले, सचिन आव्हाड, गणेश आढाव, मनोज अग्रवाल, डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे, प्रसाद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS