Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनी इंजिनिअरिंगच्या ७० विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

संगमनेर : येथील नामांकित अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील ७० विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्

निळवंडे सोसायटीच्या अध्यक्षपदी पवार तर पठाण उपाध्यक्ष
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
राजकीय हस्तक्षेपामुळे संगमनेरचा रेल्वे मार्ग बदललामाजी मंत्री थोरात ; वाढत्या हप्तेखोरी व टक्केवारीबाबत चिंता व्यक्त

संगमनेर : येथील नामांकित अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील ७० विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकऱ्या मिळाल्या असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाविषयी माहिती देताना प्राचार्य डॉ. व्यंकटेश म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षणाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना हक्काचे करिअर प्लॅटफॉर्म मिळावे यासाठी नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

या माध्यमातून यंदा कॉग्निजंट, इन्फोसिस, बॉश, टीसीएस डिजिटल, लेन्स एल क्यूब, विन्सोफ्ट, पायथर, सॉलेट इन्फोटेक अशा दिग्गज कंपन्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या ७० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयात ‘सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर एआय’, ‘ईएसडीएस क्लाऊड सेंटर’, ॲमेझॉन, आयएसटीई स्टुडन्ट चॅप्टर यांसारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी इंटर्नशिप, इंडस्ट्रियल व्हिजिट आणि सॉफ्ट स्कील सेशनचे आयोजन केले जाते. यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास सोनकर, प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रवीण वाकचौरे आणि प्रा. सचिन गडाख यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

COMMENTS