Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासेत कचऱ्याचा प्रश्न गंभीर; तीव्र आंदोलनानंतरही नगरपंचायत प्रशासनाची निष्क्रियता कायम, नागरिकांमध्ये संताप

नेवासा : शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहिलेला नसून तो नागरिकांच्या आरोग्याशी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेशी संबंधित ग

डॉ. मनुरकरांना बीजिंग विद्यापीठाची ‘विद्यावाचस्पती’ (पीएच.डी.) पदवी; शेवगावच्या ग्रामीण युवकाची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी
आंतरराष्ट्रीय लोककला स्पर्धेसाठी संगमनेरच्या त्रिशा कदमची निवड; ‘भारत महोत्सव २०२६’ मध्ये मिळवला प्रथम क्रमांक
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार आशुतोष काळेंकडून जोरदार स्वागत

नेवासा : शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहिलेला नसून तो नागरिकांच्या आरोग्याशी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेशी संबंधित गंभीर विषय बनला आहे. आठ दिवसांपूर्वी शहरात भाजप तसेच क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सोबत घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते, मात्र तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

या आंदोलनादरम्यान शहरातील विविध भागांतील कचरा हातगाड्यांमधून थेट नगरपंचायत कार्यालयाच्या पायऱ्यांवर टाकण्यात आला होता. त्यावेळी नागरिकांचा प्रशासनाविरोधातील रोष स्पष्टपणे दिसून आला होता. मात्र आंदोलनाला आठ दिवस उलटूनही शहरातील कचराकोंडी फुटलेली नाही.

शहरातील विविध भागांत, विशेषतः धार्मिक स्थळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडलेला कचरा, त्यातून उठणारी दुर्गंधी तसेच त्या घाणीमध्ये फिरणारी डुकरे आणि भटकी कुत्री यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे डास, माशा आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून लहान मुले व ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तीव्र आंदोलनानंतरही नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने, “प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही का?” असा संतप्त सवाल नेवासाकरांकडून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS