Homeताज्या बातम्या

पुणतांबा येथील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधी द्या

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील 'दक्षिण काशी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या

आंतरराष्ट्रीय लोककला स्पर्धेसाठी संगमनेरच्या त्रिशा कदमची निवड; ‘भारत महोत्सव २०२६’ मध्ये मिळवला प्रथम क्रमांक
राहाता-शिर्डी जनगणना प्रशिक्षणाची सांगता
वृद्धांसाठी घरपोच ‘हयाती’ची नोंदणी; कर्जतमधील नगरसेविका नीता कचरे यांचा अनोखा उपक्रम

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा हे शिर्डीपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर वसलेले प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. येथे गोदावरी नदी उत्तरवाहिनी होत असल्याने या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गोदावरी नदीकाठी सन १७६५ ते १७९५ या कालावधीत भव्य होळकर घाट उभारला होता आणि अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. अहिल्यादेवींनी बांधलेला वाडा आजही येथे जीर्ण अवस्थेत अस्तित्वात आहे.

गोदावरी तटावर होळकर घाटासह ब्राह्मण घाट आणि विठ्ठल घाट असे तीन प्रमुख घाट आहेत. येथे धार्मिक विधी, अस्थी विसर्जन आणि इतर संस्कारांसाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. हा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी होळकर घाटाची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या कामासाठी विशेष निधी मंजूर करून संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

COMMENTS