Homeताज्या बातम्या

अन्न व औषध प्रशासनाची गुटखा-पानमसाल्यावर धडक कारवाई; सुमारे 9.86 लाखांचा प्रतिबंधित माल  जप्त

नांदेड ; अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्रीविरोधात मोठी कारवाई करत नांदेड शहरातील एका पेढीवर छापा टाकून सुमारे 9 लाख 86 हजा

बंदी कागदावरच; शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ!
मंत्री झिरवाळ प्रकरणात आरोपीची;गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव
आरोग्याची खेळ करणार्यांना अभय नकोभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मनसेचे सोमेश्वर कदम यांची मागणी


नांदेड ; अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्रीविरोधात मोठी कारवाई करत नांदेड शहरातील एका पेढीवर छापा टाकून सुमारे 9 लाख 86 हजार 17 रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी विक्रेता व पुरवठादार अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पेढीला सीलबंद करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. 18 जून) शहरातील इतवारा परिसरातील मे. गोल्डन जर्दा स्टोअर्स, पैलवान टी हाऊसजवळ येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान 34 प्रकारचे प्रतिबंधित खाद्यपदार्थ आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये रजनीगंधा, विमल, राजनिवास, सागर, मुसाफिर, गोवा 1000, आरएमडी, व्हीवन चघळण्याचा तंबाखू, मिराज जाफरानी जर्दा, वजीर गुटखा, एम स्टेटेंड तंबाखू, सिग्नेचर पानमसाला आदी विविध प्रकारच्या गुटखा व पानमसाल्याचा समावेश आहे. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल क्रमांक 0209/2026 नोंदविण्यात आला असून विक्रेता व पुरवठादाराविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास इतवारा पोलीस करीत आहेत. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अमृता दुधाटे, अरुण तम्मडवार, अ. नं. गिरी, शिल्पा श्रीरामे, तुषार घोपे, कृष्णा मुळे आणि वैभव ढोंबरे यांच्या पथकाने केली. सहायक आयुक्त रा. मा. भरकड व अनंत चौधरी तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अवैध गुटखा व पानमसाला विक्रीविरोधात प्रशासनाने सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS