Homeताज्या बातम्या

नांदेड-निजामुद्दीन साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वेच्या 8 फेर्‍यांत वाढ

नांदेड : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीन आणि परतीच्या मार्गावरील साप्ताहिक उन्हाळी

टंचाई विभागातील कर्मचारी कायम गैरहजर? पत्रकारांच्या पाहणीत टेबल रिकामे; हालचाल नोंदीबाबतही प्रश्न उपस्थित
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताप आणि थकवा जाणवू लागल्याने ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असून लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यत
शिंदेंसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय नाही : ओमराजे निंबाळकर


नांदेड : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीन आणि परतीच्या मार्गावरील साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वेच्या आणखी 8 फेर्‍या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक 07621 ही विशेष रेल्वे 6 जून ते 27 जून 2026 या कालावधीत प्रत्येक शनिवारी हुजूर साहिब नांदेड येथून सकाळी 8.45 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 2 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. ही गाडी 6, 13, 20 आणि 27 जून रोजी धावणार आहे. तर गाडी क्रमांक 07622 ही विशेष रेल्वे 7 जून ते 28 जून 2026 दरम्यान प्रत्येक रविवारी हजरत निजामुद्दीन येथून रात्री 9.40 वाजता सुटून तिसर्‍या दिवशी रात्री 12.35 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. ही गाडी 7, 14, 21 आणि 28 जून रोजी धावेल. या विशेष रेल्वेचा थांबा पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट आणि मथुरा या स्थानकांवर दोन्ही दिशांनी राहणार आहे. या गाडीत 2 अउ, 3 अउ, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लासचे एकूण 24 डबे असणार असून उन्हाळ्यातील प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.

COMMENTS