Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार रमेश ठाकुर यांना पुत्रशोक

नांदेड : नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष तसेच गोदातीर समाचारचे वितरक रमेश ठाकुर यांचे सुपुत्र ओंकार रमेश ठाकुर (वय 23) यांचे अल्पशा

शिवाजी ओहोळ यांचे निधन
 गंगाधर तांबे यांचे निधन  
केशरबाई कापसे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन 

नांदेड : नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष तसेच गोदातीर समाचारचे वितरक रमेश ठाकुर यांचे सुपुत्र ओंकार रमेश ठाकुर (वय 23) यांचे अल्पशा आजाराने बुधवार, दि. 15 एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ठाकुर कुटुंबासह संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
ओंकार ठाकुर हे तरुण, नम्र व सर्वांशी आपुलकीने वागणारे म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे मित्रपरिवार, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेषतः कमी वयातच त्यांचा झालेला मृत्यू हा सर्वांसाठी धक्कादायक ठरला आहे. रमेश ठाकुर हे पत्रकारितेत सक्रिय असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगामुळे पत्रकार बांधवांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. अनेक मान्यवर, पत्रकार व विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ठाकुर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ओंकार यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी व भाचे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओंकार ठाकुर यांच्यावर आज बुधवारी रात्री 10 वाजता सिडको येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुःखद घटनेबद्दल विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार संघटनांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून, दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

COMMENTS