सभासदांनी दाखवलेल्या विश्‍वासामुळेच कृष्णा कारखाना अग्रस्थानी : डॉ. सुरेश भोसले

Homeमहाराष्ट्रसातारा

सभासदांनी दाखवलेल्या विश्‍वासामुळेच कृष्णा कारखाना अग्रस्थानी : डॉ. सुरेश भोसले

चांगल्या विचारांना साथ देण्याची परंपरा इथल्या लोकांची आहे. शेणोली गावाने नेहमीच कारखान्याच्या वाटचालीत मोठे योगदान दिले आहे.

वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या कामास गती देणार : छगन भुजबळ
माझी लोकशाही-माझा फळा ; फलकलेखन स्पर्धेचे आयोजन
यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार


कराड / प्रतिनिधी : चांगल्या विचारांना साथ देण्याची परंपरा इथल्या लोकांची आहे. शेणोली गावाने नेहमीच कारखान्याच्या वाटचालीत मोठे योगदान दिले आहे. सभासदांनी दाखवलेल्या याच विश्‍वासामुळे कृष्णा कारखाना साखर कारखानदारीत अग्रेसर आहे, असे प्रतिपादन जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते आणि कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

शेणोली (ता. कराड) येथे सहकार पॅनेलच्या प्रचारदौर्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार पॅनेलचे उमेदवार बाजीराव निकम, पं. स. सदस्य बाळासाहेब निकम, पैलवान आनंदराव मोहिते, सरपंच विक्रम कणसे यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

चेअरमन डॉ. भोसले पुढे म्हणाले, सहा वर्षांपूर्वी कृष्णाकाठच्या सूज्ञ सभासदांनी मोठ्या विश्‍वासाने आमच्या हातात सत्तेची सूत्रे दिली. हा विश्‍वास सार्थ ठरण्यासाठी आमच्या संचालक मंडळाने सर्वाधिक ऊस दर, मोफत साखर, कारखान्यात आधुनिकता, ऊस विकास योजना इत्यादीसारख्या नाविन्यपूर्ण योजना राबवत, कारभारात पारदर्शकता व गतिमानता आणली. सभासदांचे हित डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही कारखान्यात कारभार केला. वास्तविक कारखान्यात स्थिरता असेल, तर कारखाना उत्कृष्टपणे चालतो. त्यामुळे कारखाना चांगल्या पध्दतीने चालण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन काम करण्याची गरज आहे. आम्ही कारखान्यात प्रगती करत पुढे चाललो आहे. येत्या काळातही गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करत आहे. कारखाना साखर निर्मितीबरोबरच इथेनॉल निर्मिती करत आहे. या इथेनॉल निर्मिती प्रकल्पातून उच्च दर्जाचे इथेनॉल उत्पादन घेतले जात आहे. अशावेळी आपला कृष्णा कारखाना चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये, याची काळजी आपण सर्व सभासदांनी घेण्याची गरज आहे.

यावेळी प्रकाश कणसे, चंद्रकांत कणसे, अमोल पाटील, जयवंत पाटील, दिलीपकुमार कणसे, अशोक कणसे, संदीप पाटील, अविनाश माळी, लालासो पाटील, नारायण शिंगाडे, माणिक कणसे, रघुनाथ कणसे, वैभव कणसे, झाकीर मुल्ला, विजय गायकवाड, जालिंदर कणसे, आनंदा खुडे, तानाजी सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी, पंडित कापूरकर पतंगराव कणसे उपस्थित होते.

अविनाश मोहिते गट व उंडाळकर गटातून सहकार पॅनेलमध्ये प्रवेश

शेणोलीमधील सुनील शामराव कणसे यांनी अविनाश मोहिते गटातून तर उदयसिंह कणसे यांनी उंडाळकर गटातून जयवंतराव भोसले सहकार पॅनेलमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे डॉ. सुरेश भोसले यांनी स्वागत केले.

COMMENTS