संगमनेर : रिमझिम पावसाच्या धारा, हिरवाईले नटलेला सुंदर परिसर, विठू नामाचा गजर, टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी अत्यंत भक्तीमय वातावरणात वारकरी संप्रदायाचे पाईक महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यात स्वागत व पूजन केले. पारेगाव बु. येथे पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले.टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाच्या अखंड जयघोषात आणि विठ्ठलनामाच्या भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहपूर्ण वातावरणात त्र्यंबकनगरीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान मागील हप्त्यात झाले. त्र्यंबकेश्वर वरून निघालेल्या या वारीमध्ये सुमारे वीस हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात आज जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. लेझीम पथक, पारंपारिक वाद्य व विद्यार्थ्यांनी केलेली पारंपारिक वेशभूषा,स्वागताच्या कमानी, नटलेला परिसर यांसह सर्व गावकऱ्यांनी व सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले.

COMMENTS