Homeताज्या बातम्या

माळशेज घाटातील रस्ता खचल्याने पुणे-मुंबई वाहतूक पूर्णपणे बंद; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

पुणे: सततच्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आल्याने प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कल्याण-माळशेज

लोकमंथन इफेक्ट: चहाच्या पाकिटावर आता उत्पादन दिनांकासह मुदतही स्पष्ट; श्रीगोंद्यातील बातमीचा मोठा परिणाम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूरमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात पारदर्शक
जंतर मंतर येथील आंदोलनातील आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर दिल्ली पोलीस कारवाईच्या तयारीत; प्लॅटफॉर्मना नोटीस बजावणार
माळशेज घाटात रस्ता खचला; मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, प्रशासनाकडून  पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे: सततच्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आल्याने प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कल्याण-माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील करंजाळे गावाजवळ रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अहिल्यानगर, पुणे आणि परिसरातून माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे करंजाळे परिसरातील रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूक सुरू ठेवल्यास अपघाताचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तसेच वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेची समस्या उद्भवू नये, यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व लहान-मोठी वाहने तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा असेल पर्यायी मार्ग

माळशेज घाट बंद असल्याने वाहतूक अळेफाटा – नारायणगाव – खेड – चाकण – तळेगाव – लोणावळा – खोपोली – मुंबई या पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. या मार्गावरून वाहने सुरक्षितपणे मुंबईच्या दिशेने जाऊ शकतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र पर्यायी मार्गावर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी संयम बाळगून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची तयारी सुरू असून संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. रस्त्याची स्थिरता आणि सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, सर्व संबंधित विभागांना वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि पर्यायी मार्गावरील नियोजन प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

COMMENTS