जामखेड : शिवसेना पक्ष हा जात, धर्म, पंथ या सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन काम करणारा पक्ष आहे. सामान्य माणसाच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कधीही कमी

जामखेड : शिवसेना पक्ष हा जात, धर्म, पंथ या सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन काम करणारा पक्ष आहे. सामान्य माणसाच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कधीही कमी पडत नाही.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा पक्षाचा मूलमंत्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून क्षणाचाही विलंब न करता जामखेड मधील गरजू तरूणाच्या उपचारासाठी दोन लाख रुपयांची तात्काळ मदत दिली. कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वसामान्य जनतेची सेवा करणे, हेच आमचे ध्येय आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे आकाश बाफना यांनी सत्कार प्रसंगी केले.
आकाश बाफना यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जामखेड येथील मुस्लिम समाजातील एका गरजू तरुणाला उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत मिळवून दिली. या मदतीबद्दल मुस्लिम बांधव व शाकीरभाई मित्रपरिवाराच्या वतीने दि. १७ एप्रिल रोजी आकाश बाफना यांचे सत्कार करत आभार मानण्यात आले.
यावेळी जामखेडचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. हाजी फारूक शेख, माजी नगरसेवक शामीर सय्यद, रौफ सय्यद, दत्तात्रेय चऱ्हाटे, जावेद फिटर, अली भाई तांबोळी, शौकत भाई सय्यद, करीम भाई सय्यद, अजित बागवान, राजू सय्यद, अजहर शेख, आदिल सय्यद, अरिफ सय्यद, शहबाज सय्यद, इराणी इंतकाब, पप्पू शेख, मोसिन पठाण, हरून सय्यद, आय्यास खान, इरफान पठाण, यासीर सय्यद, अरबाज शेख, आफताब मुन्ना सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक शामीर सय्यद म्हणाले की, संकटाच्या वेळी नागरिक लोकप्रतिनिधींकडे धाव घेतात. मात्र अनेकदा त्यांना विविध कारणांनी टाळाटाळ केली जाते. अशा परिस्थितीत आकाश बाफना यांनी पुढाकार घेत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ मदत मिळवून दिली, ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS