कर्जत : रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील भौतिकशास्त्र विभागातील तीन विद्यार्थिनींनी नाविन्यपूर्ण संशोधनावर आधारित पेटंट दाखल करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.तृतीय वर्ष बीएस्सीच्या सिद्धी अशोक सागडे तसेच द्वितीय वर्ष बीएस्सीच्या प्रज्ञा अश्राजी सरवदे, योगिता बापूराव भोंडवे या विद्यार्थिनींनी संयुक्तपणे “कचरा संकलन व वाहतूक करणारी आसन व्यवस्था” या संकल्पनेवर आधारित पेटंट दाखल करून ते प्रकाशित केले आहे.ही उल्लेखनीय कामगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “आयडियाचा आविष्कार” या अभिनव उपक्रमाचे फलित आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना संशोधनाची दिशा देऊन त्याचे प्रत्यक्ष नवकल्पनांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.या संशोधन कार्यासाठी विद्यार्थिनींना भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. महेश भदाणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील संशोधनपूरक वातावरण, प्राचार्यांचे प्रोत्साहन आणि भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांना संशोधनाचे आणि नवोपक्रमाचे स्वरूप देण्याची संधी मिळत आहे.तीनही विद्यार्थिनींच्या नावावर पेटंट दाखल होणे ही महाविद्यालय तसेच भौतिकशास्त्र विभागासाठी अभिमानाची बाब असून, विद्यार्थिनींच्या सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन वृत्तीला मिळालेली ही महत्त्वपूर्ण दाद मानली जात आहे.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, सदस्य अंबादास पिसाळ, बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर, माजी विद्यार्थी संघ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS