शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी घेणार शरद पवारांची भेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी घेणार शरद पवारांची भेट

परभणी, :  भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. विजयराव गव्हाणे यांनी शुक्रवारी (दि.15) राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद

अजित पवार गटावर कारवाई करा
नागपूर विधानभवनावर धडकणार राष्ट्रवादीचा मोर्चा
पंतप्रधान एका पक्षाचे नसून देशाचे असतात

परभणी, : 

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. विजयराव गव्हाणे यांनी शुक्रवारी (दि.15) राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. या भेटी दरम्यान, राज्यात जटील बनलेल्या शैक्षणिक प्रश्‍नावर श्री.गव्हाणे यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. येत्या 18 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व शैक्षणिक संघटनाचे प्रमुख पदाधिकार्यांची एक बैठक यशदा, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील शैक्षणिक संस्थासमोर अनेक जटील प्रश्‍न उभे राहिले आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थाची भविष्यातील वाटचाल अधिकच किचकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संस्था व संस्थाचालकासमोर उभे असलेल्या प्रश्‍नावर कायमस्वरुपी तोडगा काढावा यासाठी माजी आमदार अ‍ॅड. विजयराव गव्हाणे यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे साकडे घातले आहे. शुक्रवारी (दि.15) सकाळी श्री.गव्हाणे यांनी सकाळी साडेनऊ वाजता शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी राज्यातील शैक्षणिक संस्था संघटनाचे काही प्रमुख पदाधिकार उपस्थित होते. 

या संदर्भात श्री.पवार यांनी येत्या ता. 18 ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे येथे सकाळी 11.30 वाजता बैठक आयोजित करावी असे सांगितले. या बैठकीस उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ही निमंत्रण देण्यात आले आहे असे अ‍ॅड. विजयराव गव्हाणे यांनी सांगितले. या बैठकीत राज्यातील जटील बनललेल्या शैक्षणिक समस्या, वेतन अनुदानाचे प्रश्‍न, महाविद्यालयाचे प्रश्‍न, वेतनेत्तर अनुदानाचे प्रश्‍न, नोकरभर्तीचे प्रश्‍न यावर विस्ताराने चर्चा होणार आहे असेही माजी आमदार अ‍ॅड. विजयराव गव्हाणे यांनी सांगितले.

COMMENTS