Homeव्हिडीओ

शिरपूर फर्स्टचे MSEB कार्यालयावर ठिय्या आंदोलन

https://youtu.be/niQx0k50ySw शिरपूर, जि. धुळे : नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, शेतकऱ्यांना होत असलेला अपुरा वीजपुरवठा आणि महावितरणच्या गलथान

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात
चिखलीकरांची तलवार म्यान, अशोकनीतीमुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!गरजणारे बरसले नाहीत, लपून छपून वार करणार्‍यांचे शहरातून पलायन, राजुरकरांच्या वाटेवर काटे पेरणारे तोंडावर आपटले
हिंदू धर्माच्या कुंभमेळ्यातील निधीवर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय का ?

शिरपूर, जि. धुळे : नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, शेतकऱ्यांना होत असलेला अपुरा वीजपुरवठा आणि महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर येथील MSEB (महावितरण) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना वापराच्या तुलनेत अवाजवी वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक ग्राहकांना वापर नसतानाही हजारो रुपयांची बिले आकारली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना नियमानुसार आठ तास वीजपुरवठा मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यातही कपात होत असल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.या सर्व समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष (Help Desk) सुरू करण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून नागरिकांच्या वीजबिल आणि वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे तत्काळ निराकरण होऊ शकेल.आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना आलेल्या वीजबिलांचे तोरण तयार करून ते महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले. या अनोख्या पद्धतीने आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला आणि नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले.यावेळी शहरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समस्यांचे तातडीने निराकरण न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

COMMENTS