Homeव्हिडीओ

चंदगड तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या समस्या तात्काळ सोडवा-ब्लॅक पँथर

https://youtu.be/JHpk6WG60aM चंदगड : चंदगड तालुका हा डोंगरदऱ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी शासनाच्या सोयी सुविधा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांजण ठेवले पण पाणीच नाही !पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध-डॉ.गणेश ढवळे
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी घटनेनंतर महामार्गालगत विहिरींचा  प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ! आतातरी प्राधिकरण आणि प्रशासनाला जाग येणार का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे
कोपरगावचे महिला समुपदेशन केंद्र बंद होण्याच्या मार्गावरडॉ. गावित्रे ; महिलांच्या समस्या सोडविणाऱ्या केंद्रास अद्याप पर्यायी जागा नाही

चंदगड : चंदगड तालुका हा डोंगरदऱ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी शासनाच्या सोयी सुविधा तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे अध्यापही चंदगड तालुका हा मागास म्हणूनच ओळखला जात आहे. त्यात मागासवर्गीय समाजाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजना मागासवर्गीय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी करून मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकावा अन्यथा ब्लॅक पॅंथर पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करणार असल्याच्या इशारा ब्लॅक पँथर पक्षाने दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना नुकतेच देण्यात आले.

COMMENTS