Homeताज्या बातम्या

महिला जवानांच्या तत्परतेने प्रवाशाचे प्राण वाचले

मुंबई : मुंबई विमानतळावर एका महिला प्रवाशाला अचानक चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. तिची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच केंद्रीय औद्योगिक सुर

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीकराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
झुंबरबाई घोलप यांचे निधन
कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही : पंतप्रधान मोदीभारताची ताकद त्याच्या संस्कृती, श्रद्धा आणि विचारांमध्ये


मुंबई : मुंबई विमानतळावर एका महिला प्रवाशाला अचानक चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. तिची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन महिला जवानांनी तातडीने धाव घेत सीपीआर देत उपचार सुरू केले. छातीवर दाब देण्याची आपत्कालीन वैद्यकीय प्रक्रिया करून त्यांनी महिलेची श्‍वसनक्रिया पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांत महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर वैद्यकीय पथकाने पुढील उपचार केले. जवानांच्या प्रसंगावधानामुळे महिलेचे प्राण वाचल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

COMMENTS