Homeताज्या बातम्या

वाकडी येथील विकासकामांना गती : शेळके

 राहाता : तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायतीचे युवा सदस्य अमोल शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे त्यांच्या प्रभागातील विविध विकासकामांना गती

घोडेगाव परिसरात पोषण पंधरवडा उत्साहात 
एकही बंजारा तांडा विकासापासून वंचित राहणार नाही – अमरसिंह पंडित46 लक्ष रुपये किंमतीच्या पोईतांडा तांडा येथे विविध विकास कामांचे भव्य शुभारंभ
अकोलेत कुपोषणाचे सावट गडद;३८ तीव्र कुपोषित, ३३८ मध्यम कुपोषित बालके; अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर नियुक्तीची गरज

 राहाता : तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायतीचे युवा सदस्य अमोल शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे त्यांच्या प्रभागातील विविध विकासकामांना गती मिळाली असून, शैक्षणिक, पाणीपुरवठा, रस्ते आणि मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक कामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.शेळके यांच्या प्रयत्नांतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (शेळके वस्ती) येथे संरक्षक भिंत (वॉल कंपाऊंड) उभारणे, अतिरिक्त वर्गखोली (ब्लॉक) उभारणे, पांढरीवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाऊंड, नवीन शौचालय तसेच लहारे वस्ती शाळेत अंगणवाडी दुरुस्ती, पत्रे, किचन, पडवीत फरशी बसविणे आणि चेनलिंक जाळीचे काम मंजूर करण्यात आले आहे.याशिवाय नवीन वसाहत पांढरीवस्ती येथे रस्ता खडीकरण, लहारे वस्ती कॅनॉल रस्त्याचे मुरूमीकरण, जळगाव रोड ते नामदेव पाटील शेळके वस्तीपर्यंतच्या रस्त्याचे मुरूमीकरण, रावसाहेब शेळके यांच्या घरापासून घोडे वस्तीपर्यंत पाईपलाईन टाकणे, पांढरीवस्ती दलित वस्ती विकासासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करणे, संपूर्ण प्रभागात एलईडी दिवे बसविणे, बंद पडलेले हातपंप दुरुस्त करणे तसेच पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करून नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची कामेही करण्यात आली आहेत.या विकासकामांमुळे प्रभागातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली असून, उर्वरित प्रलंबित कामांसाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे ग्रामपंचायत सदस्य अमोल शेळके यांनी सांगितले. नागरिकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

COMMENTS