बीड : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत अनुसूचित जातीतील गरजू आणि तरुण उद्योजकांसाठी आर्थिक वर्ष 2026-2027 करिता व

बीड : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत अनुसूचित जातीतील गरजू आणि तरुण उद्योजकांसाठी आर्थिक वर्ष 2026-2027 करिता विशेष घटक योजना आणि बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहेत. या दोन्ही योजनांसाठी जिल्ह्याला प्रत्येकी 20 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छुक उमेदवारांनी ारहरवळीहर.ालिलवल.ळप या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने कर्ज मागणी अर्ज भरायचा आहे. अर्जदाराने स्वतःच्या वैयक्तिक ई-मेल आयडीचा वापर करूनच अर्ज करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची मूळ प्रत आणि आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रती लाभार्थ्याने स्वतः जिल्हा कार्यालयात आणून जमा करायच्या आहेत. कोणत्याही त्रयस्त व्यक्तीमार्फत आलेले अर्ज किंवा कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही. असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

COMMENTS