Homeताज्या बातम्या

अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले; मध्यपूर्वेत वाढला तणाव

तेहरान/वाशिंग्टन: मध्यपूर्वेतील तणाव आणखी तीव्र झाला असून अमेरिकेने इराणमधील क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांसह किनारपट्टीवरील निरीक्षण केंद्रांवर मोठ

पाटोदा तालुक्यातील चिंचोली जिल्हा परिषद शाळेची भिंत वर्ष उलटूनही दुरुस्त नाही; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त बीडमध्ये ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन; समता परिषदेचा पुढाकार
देवळाली प्रवरा जिल्हा बँकेतील रोखपालच्या बदलीची मागणी; ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक दिल्यास शाखेला टाळे ठोकण्याचा इशारा
युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेचा 24 तासांत इराणवर दुसऱ्यांदा भीषण हल्ला, जगात  खळबळ - Marathi News | America attack on iran military drone site after  break peaceful deal | TV9 Marathi

तेहरान/वाशिंग्टन: मध्यपूर्वेतील तणाव आणखी तीव्र झाला असून अमेरिकेने इराणमधील क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांसह किनारपट्टीवरील निरीक्षण केंद्रांवर मोठी हवाई कारवाई केली आहे. जवळपास एक तासापर्यंत चाललेल्या या धडक मोहिमेत इराणच्या अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत ही कारवाई प्रत्युत्तर म्हणून केल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, इराणकडून अल्पावधीत अनेकवेळा हल्ल्यांचे प्रयत्न झाल्यामुळे ही कठोर भूमिका घेणे आवश्यक ठरले होते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात एका व्यापारी मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याचा आरोप इराणवर करण्यात आला आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेबाबत नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, इराणच्या संसदेतील राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी मात्र होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण इराणकडेच असल्याचे सांगत, तेथून प्रवास करणाऱ्या जहाजांनी स्थानिक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी या कारवाईला युद्धविरामाचे उल्लंघन नसून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा भाग असल्याचा दावा केला. अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविरामाबाबत चर्चा सुरू असतानाच हे विधान समोर आले आहे. युद्धविरामानंतर हल्ल्यांची तीव्रता कमी झाली असली, तरी अद्याप काही भागांत कारवाया सुरूच आहेत. दक्षिण लेबनॉनमधील काही शहरांवर झालेल्या हवाई हल्ल्यांत जीवितहानी झाल्याचीही माहिती आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन करण्यात आल्याने सीमावर्ती भागात कमालीचा तणाव आहे.

दरम्यान, इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या कारवायांना पाठिंबा देणाऱ्या नाटो (NATO) सदस्य राष्ट्रांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. ओमानजवळील सागरी मार्गात मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, काही बचाव आणि स्थलांतर मोहिमा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. दक्षिण लेबनॉनमधील नागरिकांना स्थलांतराचा इशारा देण्यात आला असून, हिजबुल्लाहने इस्रायलशी कोणतेही संबंध सामान्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

व्यापक कराराचा आराखडा तयार करण्याचे प्रयत्न सुरू

दोन्ही देशांदरम्यान तांत्रिक पातळीवरील चर्चेनंतर संयुक्त समित्या स्थापन करण्याबाबत सहमती झाल्याचे वृत्त आहे. आगामी काळात एक व्यापक कराराचा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) पथकाकडून इराणमधील अणुस्थळांची तपासणी होणे अपेक्षित आहे. दरम्यान, होर्मुझ परिसरातील या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम होत असून अनेक देश या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मध्यपूर्वेतील या वेगाने बदलणाऱ्या घडामोडींमुळे जागतिक सुरक्षा, ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS