Homeताज्या बातम्याबीड

तरुण, तडफदार व जिद्दी नेतृत्व असलेले अमर शेख यांची बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड करावी – शाहेबाज कादरी यांची मागणी

गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षासोबत ठामपणे उभा असला, तरीही बीड जिल्ह्यात सक्षम मुस्लिम नेतृत्व उभे राहू शकले नाही. त्यामुळ

भारत तोंडे यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवडमाजी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते नियुक्ती व सत्कार
बीड जिल्ह्यातील कारखानदाराकडून ऊस उत्पादकावर संक्रात-दत्ता वाकसे
आंदोलना नंतर केज नगरपंचायतीचा 4.24 कोटींचा घरकुल घोटाळा उघडतत्कालीन मुख्याधिकार्‍यासह 6 जणांवर गुन्हा दाखल; जनतेत संताप



गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षासोबत ठामपणे उभा असला, तरीही बीड जिल्ह्यात सक्षम मुस्लिम नेतृत्व उभे राहू शकले नाही. त्यामुळे येत्या काळात जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी मुस्लिम समाजाला संधी द्यावी, अशी मागणी शाहबाज-ए-लामाकानी कादरी फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शाहेबाज कादरी यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी तरुण, तडफदार आणि जिद्दीने काम करणारे माजी नगरसेवक अमर शेख यांचे नाव पुढे करत, त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करावी, अशी मागणी केली.कादरी पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षात मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी अल्पसंख्याक समाजातील नेते व कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. जिल्हा व राज्य स्तरावरील महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम समाजाला अधिक संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. काँग्रेस पक्ष सर्वसमावेशकतेचा विचार मांडत असला, तरी स्थानिक पातळीवर पदवाटप करताना सर्व समाजघटकांना, विशेषतः अल्पसंख्याकांना, न्याय्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद मुस्लिम समाजाला देण्यात यावे, अशी ठाम मागणी कादरी यांनी केली.

COMMENTS