सर्वसामान्य कुटुंबातील आफरीन ईस्माइल सय्यद हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डाक सेवक म्हणून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.कडा येथील सर्वसामान्य

सर्वसामान्य कुटुंबातील आफरीन ईस्माइल सय्यद हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डाक सेवक म्हणून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.कडा येथील सर्वसामान्य कुटुंबातील आफरीन ईस्माइल सय्यद या विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षणासाठी बाहेर जाता येत नाही, याची खंत न बाळगता जिद्दीच्या बळावर तिने घरी राहूनच बारावीनंतर ऑनलाईन शिक्षण घेतले. त्यासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. शैक्षणिक प्रगतीबरोबरच तिने ईएसएस इन्स्टिट्यूट, दिल्ली येथून ए+ ग्रेडसह डीसीए कोर्स पूर्ण केला. तसेच एनआयआयटीचा डिजिटल उत्पादकता अभ्यासक्रम आणि ही सीएफआय चा एक्सेल फंडामेंटल कोर्स आफरीनने पूर्ण केला. केवळ कौटुंबिक अडचणींमुळे घरी राहूनच तिने सर्व कोर्स ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केले, हे उल्लेखनीय असून, दहावीत 96.20% गुण मिळवले असून, विज्ञान शाखा निवडून बारावीमध्ये 87.50% गुणांसह महाविद्यालयातून तिसरा क्रमांक मिळवला. सध्या बीए अंतिम वर्षात इंग्रजी विषयात शिक्षण घेत आहे. मनामध्ये शिकण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर परिस्थिती अडथळा ठरत नाही हेच आफरीनने दाखवून दिले आहे.

COMMENTS