भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष क

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. या विचारांची जाणीव ठेवत उपेक्षित समाजघटकांच्या हक्कांसाठी लढा उभारण्याची प्रेरणा त्यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी युवकांनी संघटित होऊन आंबेडकरी विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन रिपाइंचे जिल्हा सहचिटणीस राजू जोगदंड आणि रिपाइंचे बीड तालुकाध्यक्ष किसन तांगडे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून, युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कुमसी (ता. जि. बीड) येथे रिपाइं नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा, रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली म्हणजे त्यांच्या विचारांची चळवळ पुढे नेणे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास प्रा. फुलचंद लुचारे, बाळासाहेब ठोंबरे, रामेश्वर खळगे, संदेश मस्के, मिठू वाघमारे, ऋषी धुताडमल, कैलास जोगदंड तसेच रिपाइं कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS