भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी भारत तोंडे यांची निवड करण्यात आली आहे. माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते त्या

भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी भारत तोंडे यांची निवड करण्यात आली आहे. माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप नेते संतोष हांगे, चंद्रकांत फड, देविदास नागरगोजे, माजी सभापती विष्णू घुले, भारत बाप्पा काळे, अशोक रसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारत तोंडे यांनी गेल्या 17 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला असून अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, जुनी पेन्शन योजना, तसेच शिक्षक परिषदेमधील सक्रिय सहभाग यासाठी ते ओळखले जातात. शिक्षकांच्या अडचणीच्या काळात त्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मराठवाडा शिक्षक आघाडीचे विभागीय अध्यक्ष भातलवंडे सर यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, भाजप नेते सर्जेराव तात्या तांदळे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना भारत तोंडे यांनी सांगितले की, मंत्री पंकजाताई मुंडे आणि माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी ते कार्य करतील. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी भारत तोंडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS