Homeताज्या बातम्याबीड

बीड जिल्ह्यातील कारखानदाराकडून ऊस उत्पादकावर संक्रात-दत्ता वाकसे

बीड जिल्ह्यातील ऊस ऊस उत्पादकावर सर्वच कारखानदाराकडून ऊस गाळपासाठी घेऊन गेलेल्या कारखानदाराकडून शेतकर्‍याची गळचेपी केली आहे एप्रील महीना संपण्याच

टाकळीत उडणार धुरळा! ‘रानोबा केसरी’ बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणारनागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – युवा नेते सुरज घुले
मिल्लीया महाविद्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा
अंबाजोगाईत एस.एफ.आयकडून जलकुंड स्वच्छता मोहीम राबवली



बीड जिल्ह्यातील ऊस ऊस उत्पादकावर सर्वच कारखानदाराकडून ऊस गाळपासाठी घेऊन गेलेल्या कारखानदाराकडून शेतकर्‍याची गळचेपी केली आहे एप्रील महीना संपण्याच्या मार्गावर आहे तरी अद्यापही ऊस उत्पादकांना ऊसाची रक्कम मिळाली नाही अशी संतप्त प्रतिक्रीया मल्हार ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी दिली आहे  पुढे ते म्हणाले की ऊस उत्पादकांच्या  शेतकर्‍यांचे पैसे दिले बीड जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी शेतकर्‍याच्या घामाचे उसाचे पैसे आणखीही दिलेले नाहीत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके गेली, रब्बी अल्प प्रमाणात आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून सततच्या नापिकीला कंटाळून एक नगदी पीक म्हणून शेतकर्‍यांनी ऊसाला पसंती दिली उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली याचा फायदा ऊसतोड कामगार, ठेकेदार आणि कारखानदार यांनी घेतला. ऊस उत्पादकांचे डिसेंबर महिन्यात गेलल्या उसाचे पैसे मिळाले नाही. सर्वच कारखानदाराकडून  ऊस उत्पादकांना रक्कम ऊसाची मिळाली नाही. शासनाने शेतकर्‍यांना वेळेत पैसे न दिल्यास पंधरा टक्के व्याज देण्याची घोषणा केली घोषणा हवेत विरल्या असून उसाचे पैसे कधी मिळणार याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.सध्या मोठ्या प्रमाणात लग्नसराई मोठ्या प्रमाणात सुरू आहे अनेक ऊस उत्पादकांनी कारखान्याच्या भरोशावर मुलींच्या मुलांच्या लग्नाच्या तारखा काढल्या परंतु या कारखान्याने पैसे न दिल्यामुळे त्यांना सावकाराच्या दारात जाऊन उभे राहावे लागत आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी शेतकर्‍याच्या खात्यामध्ये येईल त्या आठ दिवसांमध्ये उसाचे बिल जमा न केल्यास शेतकर्‍याला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मल्हार ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.

COMMENTS