बीड : शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र येथे सात दिवसीय योग शिबिराचे उत्साहा

बीड : शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र येथे सात दिवसीय योग शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. 15 जून ते 21 जून 2026 दरम्यान हे योग शिबिर घेण्यात आले.
दररोज सकाळी 7 ते 9 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात निवारा केंद्रातील महिला व पुरुषांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. योगशिक्षक डॉ. संजय तांदळे, भारत ठोंबरे, डॉ. राधा तांबे, राजू वंजारे, अर्चना सूर्यवंशी, अभिजीत वैद्य, उद्धव लाड आदींनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. योगाच्या नियमित सरावामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासोबतच मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. सात दिवसीय योग शिबिराचा समारोप आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दि. 21 जून 2026 रोजी सकाळी करण्यात आला. यावेळी योगशिक्षक अभिजीत वैद्य, राजू वंजारे आणि छाया सरोदे यांनी योग प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या समारोप कार्यक्रमाला जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रातील महिला, पुरुष तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

COMMENTS