Homeताज्या बातम्या

समाजसेवक शेख सलीम यांना ‘युवा लोकमित्र’चा समाजसेवक गौरव पुरस्कार प्रदान

बीड शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक तथा अध्यक्ष शेख सलीम यांना दैनिक युवा लोकमित्रच्या वतीने ‘समाजसेवक गौरव पुरस्कार’ द

वेदमूर्ती परीक्षेत आदित्य कुलकर्णी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
कोपरगाव तालुका शिक्षक भारती संघटना कार्यकारिणी जाहीर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबई निळ्या प्रकाशाने उजळून निघाला!



बीड शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक तथा अध्यक्ष शेख सलीम यांना दैनिक युवा लोकमित्रच्या वतीने ‘समाजसेवक गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करणार्‍या शेख सलीम यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दैनिक युवा लोकमित्रचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी समीर काझी, प्रेमलताताई पारवे, शेख मुजीब, गणेश सावंत, भागवत तावरे, वैभव स्वामी, ए. एस. गोलू आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शेख सलीम यांचे अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. समाजसेवक म्हणून शेख सलीम यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून, अशा प्रकारच्या पुरस्कारांमुळे सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना नवी ऊर्जा मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.-

COMMENTS